top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

सामाजिक परिवर्तनचा संदेश देणारा बंजारा भाषेतील काव्यसंग्रह - 'भिया अब लडा रे ' .

पुस्तक परिचय : -

सामाजिक परिवर्तनचा संदेश देणारा बंजारा भाषेतील काव्यसंग्रह -

भिया अब लढा रे .

----------------------

भटकंती करणाऱ्या समाजाचे चित्रण

वर आभाळ खाली धरती . बंजारा समाजाची त्यात भटकंती . निसर्गाचा सानिध्यात पशुधनासोबत संसाराच्या सुरु असलेल्या रहाटगाड्यात पडलेल्या समाजाला कुठेतरी स्थिरता मिळते पण वैचारिक दृष्ट्या अधिक समृद्ध होण्यासाठी कवितेला क्रांतीची मशाल समजणारा कवी उदल राठोड हा चळवळीतला कार्यकर्ता आहे . साहित्याचे मोल जाणणारा माणूस आहे .कवितेतून झालेल्या क्रांतीचा इतिहास माहीत असलेला चळवळीतला कार्यकर्ता .

सोबतच विद्युत मंडळात कार्यरत असल्याने अंधार दूर करून प्रकाश देणारा गरज पडल्यास शब्दाच्या माध्यमातून 440 चा करंट देण्याची ताकद ठेवणारा .कुठे अडचण आहे व कुठे योग्य उर्जेचे कनेक्शन दिले पाहिजे हे जाणणारा संवेदनशील मनाचा कवी आहे . या संग्रहातील 40 कविता गोरबोली बंजारा भाषेतून व्यथा वेदना वर्तमान स्थिती व भविष्याबद्दल बोलतात .सोबतच या संग्रहातील कविता सामाजिक परिवर्तन हसह सामाजिक एकतेचा संदेश संविधानिक मूल्यांची गरज व चळवळीचे महत्त्व अधोरेखित करतात विचार क्रांतीला बळ देतात म्हणून कवी म्हणतो ,

'विचारेर लडाई आपण

ढाल बणन दोई लडारे

एकीर ताकद आपण

दनियान दकाकारे ' ...

सामाजिक परिवर्तनासाठी हुंडा न घेण्याची शपथ साधेपणाने लग्न करून अवास्तव खर्चाला फाटा देणे मुलीच्या शिक्षणाचा आग्रह सोबतच डीजे व नशीला थारा न देऊन साध्या पद्धतीने लग्न सोहळा पार पाडणे अशा आशयाची कविता सामाजिक परिवर्तनासाठी लाख मोलाची ठरते .

मानवी जीवनाचे सार सांगताना कवी मीपणा गर्विष्ठपणा सोडून वागण्याचा सल्ला देतो. समाजात होणाऱ्या खेचाखेची बद्दल सांगताना काही रोखठोक सवाल समाजाला विचार करून अंतर्मुख व्हायला लावतो व परिवर्तन आणण्यासाठी अंधश्रद्धा सोडून नवा मार्ग निवडण्याचा विचार कवी कवितेतून मांडतो .

समाज माध्यमातून तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कोरड्या पाषाणांची

हजेरी घेणारी 'तांडा सामू देखो ' या शीर्षकाची कविता कवीमध्ये असलेल्या कार्यकर्त्याची आंतरिक तळमळ दाखवते संस्कृती व भाषेचा अभिमान बाळगण्याचा सल्ला देणारी कविता या संग्रहात पाणी क्रमांक 16 वर दिलेली आहे .

कुंभकर्ण सारखं झोपेतून उठा आणि जागे व्हा व आपल्याला फुकट काही मिळत नाही त्यासाठी संवैधानिक हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढण्याचा सल्ला 'जागो गोरमाटी भाई ' या कवितेतून कवी देतो .

क्रांतिकारी विचार देणारे सेवालाल महाराज यांच्या कार्याला नमन करून त्यांच्या मानवतावादी विचारांचा जागर करत माणसाची वागणूक कशी असावी हे सांगताना कवी ढोंग आणि पाखंडावर प्रहार करताना म्हणतो ,

' ढोंगी अबा बाबा

कन मत जावो

सोतार हेत तम

सोताच पुरो करो ' .

कवीचे निरीक्षण अचूक टिपण चिकित्सक लेखनाने काव्यसंग्रहाचे सौंदर्य बहरलं आहे .

'घोर कलियुग ' या कवितेतून बलात्कारी हैवानांना फाशीच झाली पाहिजे . यासाठी कवीची लेखणी पुढाकार घेताना दिसते तर शेतकऱ्याची वर्तमान अवस्था

' कास्तकार भिया ' या कवितेतून मांडताना कवी येणाऱ्या संकटावर मात करण्याची हिम्मत शेतकऱ्यांच्या मनात भरतो .

' फेटीया काचळी ' कविता वास्तव स्थितीचं मार्मिक चित्रण करते व समाजाने चिंतन करावे म्हणून काही प्रश्न मांडते .

सरकारी कर्मचाऱ्यांचे संकट काळातील बहुबल कार्य समाजासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची गरज व महत्त्व 'सरकारी कर्मचारी ' या कवितेतून व्यक्त केली आहे . 'तांडेर नायक 'या कवितेतून सेवा वसंताचा प्रेरणादायी सुधारणावादी कार्य करण्याचा प्रगतिशील विचार प्रबोधनाचा विचार तांडा पाड्यात घेऊन जाण्याचा संदेश कवीने दिला आहे .

'लोक जागे करेर

आब लेला हातेम काम

सेवा वसंतार विचार

ले जावा तांडे पेडे साम ' .

कवितेचे महत्व कवितेची ताकद जागतिक कविता दिनाची गरज याविषयी ' कविताम ऊ ताकत छ '

या कवितेत कविते सांगितलेले आहे कवी उचल राठोड यांचा नवविचाराकडे घेऊन जाणारा प्रबोधन करण्यासोबत शिक्षण जनजागृती व सामाजिक सुधारणांचा संदेश देणारा कवितेची ताकद ओळखणारा व

व स्वतःच्या हक्कासाठी एकत्र येऊन संघर्ष करायला लावणारा हा कवितासंग्रह नक्कीच तांड्या पाड्यातील वंचितांना जगण्याची व लढण्याची उमेद देण्याची ताकद ठेवतो . 'भिया अब लडारे '

म्हणून शब्दांच्या माध्यमातून जागृतीचा उजेड पसरवितो .

कवी उदल राठोड यांच्या काव्यमय प्रवासाला gorbolibanjararadio.com तर्फे हार्दिक शुभेच्छा .🌹🌹🌹📚📚📚📚

----------------------

✍️एकनाथ लक्ष्मण गोफणे .

8275725423

65 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page