top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी कवीच्या आत्मीय स्वर विचारांचा - 'आकांत'

अपडेट करने की तारीख: 9 अप्रैल

पुस्तक परिचय

--------------------


व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी

कवीच्या आत्मीय स्वर विचारांचा - 'आकांत'

----------------------

'गोरपीठ ' कविता संग्रह आणि विराटण लावण . पणि नायकण

या गोरबोली भाषेतील खंड काव्यानंतर परिवर्तनाची आस ,सामाजिक विकासाचा ध्यास व व लेखणीला विद्रोहाची धार असलेले कवी .अमोल नायक यांचा ५१ कविता समाविष्ट असलेला 'आकंत 'मराठी कविता संग्रह दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी साखरणी जिल्हा नांदेड येथे प्रकाशित करण्यात येणार आहे .

कवीच्या आत्मीय स्वर विचारांचा हा आकांत मराठी साहित्य क्षेत्रात परिवर्तनाच्या दिशेने उभा राहिलेला आहे . दमाळ प्रकाशन - चंद्रपूर ,यांनी प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाची मुखपृष्ठ संकल्पना रंजीत वर्मा यांनी तयार केली आहे .

स्त्री मनाचे दुःखद क्षण , वेदना, समस्याच्या ज्वालांमध्ये होरपळणाऱ्या स्त्रीयांचे अश्रु लेखणीद्वारे झेलत आधार देणारी

काव्यसंग्रहाची मध्यवर्ती कल्पना

मुखपृष्ठावर साकारली आहे .

कवी अमोल राठोड यांनी हा काव्यसंग्रह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केलेला आहे .

काव्यसंग्रहातील 'आकांत ' ही पहिली कविता संत सेवालाल महाराज यांच्या मातोश्री 'धरमणी याडी ' यांच्या मनाचा आकांत म्हणून कवीने मांडलेली आहे .

सोबतच अनेक प्रश्न समाजाला विचारले आहेत .

बुद्ध संजीवनी या कवितेतून बुद्धाच्या शांतीचा संदेश देत निसर्ग व पर्यावरण रक्षणाचा मौलिक संदेश वैचारिक स्वरुपात मांडलेला आहे .

विचारांची साखळी प्रभावी असली

की परिवर्तन कसे प्रभावी होते . हे विचार सकाळी या कवितेतून मांडताना कवीने गौतम बुद्ध ,संत कबीर ,संत तुकाराम , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचाराची अभंग रुपाने मांडणी केली आहे .

काव्यसंग्रहाचा 'प्रवाह ' हा तिमिरातून तेजाकडे जातो .

आकांत हा काव्यसंग्रह सर्व महामानव शूरवीर आणि परिवर्तनासाठी लढा देणाऱ्या वीर योद्धांची गाथा आहे .सावित्रीबाई फुले ,बिरसा मुंडा संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचा आढावा काव्यरुपाने कवीने घेतलेला आहे .

' होय मी सेवालाल बोलतोय ' कवीने समाजाला प्रश्न विचारले आहेत . तर 'खून ' या कवितेतून परिवर्तनाची बिजे रोवणाऱ्या सेवादास महाराजांच्या विचारांचा सध्याच्या काळात कसा खून होत आहे . याची चिकित्सक मांडणी केली आहे .

कविचा परिवेश हा परिवर्तनाच्या प्रबोधनाच्या छायेतील आहे .

स्वतः शिक्षक असलेला कवी लोकशिक्षक म्हणून सुद्धा या काव्यसंग्रहातून दिसून येतो .

कवी म्हणतो ,

विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात ,

रोज मी डोकावतो .

सत्यता प्रामाणिकता आणि

निरागसतेचे धडे रोज शिकतो . '


शेतकऱ्याच्या सद्यस्थितीवर हळहळ व्यक्त करताना कवी म्हणतो ,

' निसर्गाची अती

शेतकऱ्यांची माती .

मतांसाठीच का?

सरकारची नाती .

बाजूला ठेवा हा , राजकिय विकार

कुठे झोपले आहे

मायबाप सरकार ? '


काव्य संग्रहातील , सावित्रीच्या लेकी , तांडो संकल्पना , बा -भीमा , आत्महत्या , रंग , बहुजना चिंता तुझीच रे , सिक्सीत अडाण्या , ब्लँक मेमरी , कर्जबाजारी , उठा मतदात्यांनो

या कविता चेतना निर्माण करतात .

महानायक वसंतरराव नाईक व भीमणीपुत्र मोहन नायक यांच्या कार्यावर काव्यरुपी सुरेख गुंफण करण्यात आली आहे .

दंगल - एक षडयंत्र कविता चिंतन करण्यास भाग पाडते .

'उठा मतदात्यांनो ' कवितेतून

लोकशाहीची मूल्ये जपण्याचा संदेश दिला आहे .


'स्वतः जागे व्हा

इतरांना जागे करा

अजून वेळ गेलेली नाही

मतदानाचा अधिकार बजावा

लोकशाही अजून मेलेली नाही ' .


काव्यसंग्रहातून कवी महिलांच्या दुःखाला वाचा फोडतो , पर्यावरण रक्षण ,निसर्गप्रेम जपण्याची गरज सांगतो .पाणीटंचाई व शेतमालाच्या भावाची चिंता व्यक्त करतो . दांभिक पत्रकारीतेवर प्रश्न उपस्थित करुन , खऱ्या पत्रकारांचे कर्तव्य सांगतो . काव्यसंग्रहातील 'कविता ' या शीर्षकाची शेवटची कविता कवीचं काव्यप्रेम , उत्कट ओढ व कवितेचं कवी व समाजासाठीचे महत्व अधोरेखित करते .

कवी कवितेला नदीसारखी प्रवाही म्हणतो .

' धार्मिक पुरोगामी

विषय अगणित

तुझ्याच पोटी जन्मते ,

विचारधारा सोबत घेऊन

नदीसारखी वाहते ' .

अशीच कवी अमोल नायक यांची

'आकांत ' या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता परिवर्तनाची आशा घेऊन येते व वाचकांशी नाते जोडते .व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी

कवीच्या आत्मीय स्वर विचारांचा 'आकांत' करते .

कवी अमोल नायक यांच्या मराठी साहित्यातील या दमदार पदापर्णाला हार्दिक शुभेच्छा .🌹

पुस्तक परिचय - एकनाथ लक्ष्मण गोफणे .

8275725423



147 दृश्य0 टिप्पणी

コメント


bottom of page