top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

बंजारा भाषेतील बालसुलभ कवितांचा शब्दझुला 'हिंदोळो ' काव्यसंग्रह .

बंजारा भाषेतील बालसुलभ कवितांचा शब्दझुला 'हिंदोळो ' काव्यसंग्रह .

--------------------

यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेले कवी ओंकार राठोड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत .

त्यांनी मराठी भाषेतील

डोंगरमाथा ,व्यसनमुक्त पहाट बालहर्ष या बालकाव्यसंग्रहानंतर

बंजारा भाषेत हिंदोळा नावाचा एक बालगीत संग्रह पायगुण प्रकाशन अमरावती तर्फे प्रकाशित केलेला आहे .

बंजारा भाषिक तथा मराठी भाषेतील मुलांना आनंददायी पद्धतीने काव्यरचनेची आवड निर्माण करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे .

विविध विषय घेतलेल्या एकूण 74 कविता या काव्यसंग्रह मध्ये त्यांनी प्रकाशित केलेले आहेत .

बंजारा बोली भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी राठोड सरांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे .

विशेष म्हणजे या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेच्या खाली चौकटीमध्ये मराठीतून ए ते झेड आणि क ते ज्ञ या अक्षरांपासून विविध जागृती पर संदेश पण त्यांनी दिलेले आहेत .

आपल्या बोली भाषेबद्दल असलेला अभिमान त्यांनी आपल्या शब्दांमधून व्यक्त केलेला आहे .

'मारे समाजेर भाषा गोरमाटी

प्रेमेर शब्द रेय दो सदा ओठी

ऋणानुबंधेर जोडा आपण ताटी .


बालपणाच्या आठवणी सांगणारी ' हारद आवाच बालपण '

ही कविता प्रत्येकाला बालपणाच्या आठवणीत घेऊन जाते .कवी म्हणतो ,

'आकी पर पट्टी बांधला

रमते थे हाल्या डुबाला

झाडेन बांधन पाळणा

उंचो उंचो झोका हिचला ' .


या बालकवितांमध्ये जंगलातील प्राण्यांच्या गमती जमती विविध पक्षी प्राण्यांमधील संवाद वाचतांना आनंद वाटतो .

पाणी बचतीचा संदेश देणारी बालकविता बालकांच्या मनावर पाणी बचतीचा संस्कार देऊन जाते .

' जीवन जगेसारु पाणी आधार

पाणी अनमोल उपयोग हजार ' .


बळदगाडी (बैलगाडी ) , जोकर , काळो कागला ( काळा कावळा )

शाळेम जाये दरं या कविता वाचकाला वेगळ्या विश्वात घेऊन जातात .

शाळेम जाये दरं या कवितेत शिक्षणाची महती सांगताना कवी म्हणतो ,

' मार याडी बाप रे मजुर

रात अन दन करं मरमर

दुसरो छेनी काई आधार

आकी माई आसुरी धार

याडी बापेर आसू पुसे द रे .

मन भी शाळेम जाये दरे . '


आजीच्या झोपडीतील स्वच्छता ही बालमनाला स्वच्छतेचा मंत्र देऊन जाते. 'झुपडी ' या शीर्षकाच्या कवितेतून कवी म्हणतो ,

'दादी तार झुपडी

स्वच्छ अन सुंदर

दिसायेन मात्र

छ एक नंबर '


'ताऱ्या नाऱ्या ' या कवितेतील तालबद्धता विद्यार्थ्यांना विविध वाद्यसंगीतांचा परिचय करून देते .

'नाऱ्या ताऱ्या वाजा वजाव

धाऱ्या पऱ्या थाळी वजाव '


बंजारा भाषेतील बालसुलभ कवितांचा शब्दझुला असलेला 'हिंदोळो ' काव्यसंग्रह प्रकाशित करुन कवी ओंकार राठोड यांनी कौतुकास्पद प्रयत्न केलेले आहेत . त्यांच्या लेखन कार्याला हार्दिक शुभेच्छा .

--------**

✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे

8275725423

चाळीसगाव

5 दृश्य0 टिप्पणी

コメント


bottom of page