कळस...
तू शिंपडलस भिमा
स्वाभिमानाचे अत्तर,
शोधलास निर्धाराने
तमाम कुप्रथेचे उत्तर...
तू कळस शिक्षणाचा
वाली दीन दलितांचा
तू बनलास आवाज
रे मुक्या मनामनांचा...
अंधारल्या मस्तकात
तू पेटविल्या मशाली,
तू आणलीस खेचूनी
उपेक्षितां घरी दिवाळी..
तू क्रांंतीसूूर्य तळपता
आमच्या आभाळाचा,
तू दाखविलास रे मार्ग
सन्मानाने जगण्याचा...
-------------------------------------------
©️®️
कवी - विनोद राठोड
कल्याण (मुंबई)
Comments